केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले की, ‘मेरीटाइम वीक’ सारख्या कार्यक्रमांसाठी मुंबई हे योग्य ठिकाण आहे. महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी आहेत. त्याचा लाभ देशातील उद्योगांना व्हावा. महाराष्ट्राचे सागरी क्षेत्रातील स्थान महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालय आणि इंडियन पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे सागरी धोरण, नवोन्मेष, शाश्वत विकास, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि समुद्री उद्योग क्षेत्रातील वाढ यावर चर्चा आणि प्रदर्शन करण्याचे हे एक व्यासपीठ ठरणार आहे. यामध्ये अनेक उपप्रकल्प, चर्चासत्र आणि थीम असतील.
या कार्यक्रमास १०० पेक्षा जास्त देश, हजारो प्रतिनिधी आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उद्योग सहभागी होणार असून ५०० हून अधिक प्रदर्शकांसह ७ सहयोगी देशांच्या मंत्रीस्तरीय प्रतिनिधींची उपस्थिती असेल.
००००
No comments:
Post a Comment