या दौऱ्याद्वारे समितीने महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची सद्यस्थिती जाणून घेतली. आगामी काळात त्यांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व्हावी यासाठी शासनाला योग्य त्या शिफारसी करण्यात येणार आहेत.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी महिलांच्या मुलांशी गळा र्भेटीच्या उपक्रमांबद्दल, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या समुपदेशन आणि कायदेविषयक मदतीबद्दल माहिती दिली.
उपायुक्त सुवर्णा पवार यांनी महिलांना सुधारगृहात दिल्या जाणाऱ्या रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाबाबत सांगितले. या प्रशिक्षणातून मिळणारी रक्कम महिलांना सुधारगृहातून बाहेर पडताना दिली जाते, ज्यामुळे त्यांचे पुनर्वसन सुलभ होते.
कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी महिला व बालकांसाठी उपलब्ध आरोग्य सुविधा, खाटा, आयसीयू, सोनोग्राफी, तसेच “स्वस्थ नारी सशक्त परिवार” योजनेबाबत माहिती दिली.
दौऱ्यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक योगेश देसाई, अधीक्षक विकास राजनळवार, जेलर अमृता यशवंते, संतोषी कोळेकर, पौर्णिमा सोनवणे, कल्पना खंबाईत, जिल्हा बालसंरक्षक मीरा गुडिले, अधिक्षीका निशिगंधा भवल, तसेच आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, डॉ. वैशाली चंदनशिवे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment