Wednesday, 15 October 2025

कापूस खरेदी नोंदणी सुलभ, जलद होण्यासाठी

 कापूस खरेदी नोंदणी सुलभ, जलद होण्यासाठी

ॲग्रीस्टॅकच्या माहितीचा वापर करा

- पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. १४ : राज्यामध्ये सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यात येते. या खरेदीसाठी शेतकऱ्यांची 'किसान कपास ॲपवर नोंदणी सुरू झालेली आहे. ही नोंदणी अधिक सुलभ आणि जलद गतीने होण्यासाठी कृषी विभागाकडील 'ॲग्रीस्टॅक पोर्टलची आधार संलग्न माहिती उपयोगात आणावीअसे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. 

राज्यात होणाऱ्या किमान हमीभावाने कापूस खरेदी नोंदणी आणि खरेदीच्या नियोजनासाठी मंत्रालयात मंत्री पणन जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस आमदार देवराव भोंगळेकृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगीपणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेसीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक ललित गुप्तामहाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अभय महाजन आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi