Saturday, 11 October 2025

पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वितरण

 पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वितरण

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि. 7 : मराठवाड्यासह राज्यातील काही भागांमध्ये परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत महिलांच्या आरोग्याच्या गरजांचा विचार करून पूरग्रस्त महिलांसाठी वैयक्तिक स्तरावर पाच लाख सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले आहे. तसेच सक्षम फाउंडेशनतर्फे आणखी दहा हजार सॅनिटरी पॅड पूरबाधित महिलांना देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात माध्यमांशी बोलताना दिली.

मंत्री तटकरे म्हणाल्यापूरामुळे अनेक कुटुंबांचे जगणे विस्कळीत झाले आहे. शासनामार्फत अन्नवस्त्र व आर्थिक साहाय्य दिले जात असले तरी महिलांच्या आरोग्याशी निगडित सॅनिटरी नॅपकीनसारख्या मूलभूत गरजाही पूर्ण करण्यात येत आहेत. राज्यातील पूरग्रस्तभागातील आठ ते नऊ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनाच्या राखीव निधीतून सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

त्याचबरोबर सामाजिक संस्थांना आवाहन करताना मंत्री तटकरे म्हणाल्या कीमहिला व मुलींच्या आरोग्यसुरक्षेसाठी सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन पूरग्रस्त भागात मदतीचा हात द्यावा. पूरग्रस्त महिलांच्या सन्मान आणि आरोग्याच्या संरक्षणासाठी सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच या महिलांसाठी आधारदायी ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi