ज्येष्ठ कवि आणि लेखक वा.रा.कांत यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त
सांस्कृतिक कार्य विभागाची सांगीतिक मानवंदना
मुंबई, दि. 28 : यंदाचे वर्ष महाराष्ट्रातील ज्येष्ठ कविवर्य आणि लेखक वा.रा.कांत यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सांगीतिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून वा.रा.कांत यांच्या जीवनावर आधारित एका सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई या ठिकाणी 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अभिनेते संजय मोने, ज्येष्ठ अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व मुकुंद कांत हे सहभागी होणार असून, लोकप्रिय गायक श्रीरंग भावे, अभिषेक जोशी व लोकप्रिय गायिका मृण्मयी फाटक यांचे सादरीकरण होणार आहे, तर निवेदन धनश्री दामले या करणार आहेत.
‘बगळ्यांची माळ फुले’ या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, यांची असून या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आहे.
रसिक प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment