Friday, 24 October 2025

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी भारतात संरक्षण क्षेत्रात

 सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी भारतात संरक्षण क्षेत्रात सुमारे 12 हजार 80 कोटींची गुंतवणूक करत आहे. नागपूर येथे यातील 680 कोटी रुपयांची गुंतवणूक करून हा प्रकल्प मिहान मधील विशेष आर्थिक क्षेत्रात साकारला जात आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 400 प्रत्यक्ष रोजगार निर्मिती व सुमारे एक हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.

या प्रकल्पामुळे संरक्षण उत्पादन उद्योग क्षेत्रात नागपूरला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळणार असून विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीत मोठी भर पडणार आहे. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित असून विविध उद्योजकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करणेप्रादेशिक रोजगारनिर्मिती वाढवणेसंरक्षण व इतर उत्पादन क्षेत्रात राज्याला अव्वल स्थानी नेणे, हे मिहानचे ध्येय असल्याचे एमएडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.विपीन इटनकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi