Wednesday, 29 October 2025

मौजे केवनाळे येथील पुनर्वसितांच्या घरांसाठी वाढीव निधीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी

 वृत्त क्र. ४१८६

मौजे केवनाळे येथील पुनर्वसितांच्या घरांसाठी

 वाढीव निधीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी

-         मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

 

मुंबईदि. २९ : पोलादपूर तालुक्यातील मौजे केवनाळे (जि. रायगड) गावच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जागेचे भूसंपादन करण्यात आले आहे. या जागेवर घर बांधण्यासाठी शासनाकडून प्रत्येक घरासाठी २.३० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र या गावच्या नागरिकांनी घर बांधण्यासाठी वाढीव निधीची मागणी केली आहे. हा वाढीव निधी विविध कंपन्याच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उपलब्ध होण्यासाठी संबधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत रायगड जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर बैठक घ्यावीअसे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.

 

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मौजे केवनाळे ता. पोलादपूर (जि. रायगड) गावच्या कायमस्वरूपी पुनर्वसन संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस खासदार सुनील तटकरेआपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाणमदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव संजय इंगळे आदी उपस्थित होते.

 

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील म्हणालेकेवनाळे येथील कुटुंबाचे खासगी मालकीच्या जागेमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात येऊन याठिकाणी वीज, पाणी पुरवठा, शौचालय आदी सुविधांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे.  या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जागेचे भूसंपादन करण्यात आले आहे.  नागरिकांनी इरशाळवाडी व तळीये येथील नागरिकांना देण्यात आलेल्या घरांप्रमाणे घरे मिळावीत अशी मागणी केली आहे. यासाठी विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अधिकचा निधी मिळण्याबाबत बैठक घ्यावीअसे निर्देश त्यांनी दिले.

 

केवनाळे गावांमधील नागरिकांना घर बांधणीसाठी प्रत्येक घरासाठी २.३० लाखाचा निधी राज्य गृह व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण ऐवजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी मंजुरी देण्यात येऊन हा निधी जिल्हाधिकारी, रायगड यांच्यामार्फत संबंधित तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला आहेअसेही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi