श्री. आवटे यांनी प्रास्ताविकात या योजनेंतर्गत राज्यातील ९ जिल्ह्यात पाच वर्षाचा आराखडा करून कृषी विकासाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी महाडीबीटीच्या माध्यमातून विविध योजनांच्या लाभासाठी सर्वाधिक ४३ लाख १५ हजार शेतकऱ्यांची निवड केल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात सेंद्रिय शेतीत उत्कृष्ट काम केलेल्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. काही प्रगतिशील महिला शेतकऱ्यांना कार्यक्रमातच पुरस्कार देण्याचा निर्णय कृषीमंत्री श्री. भरणे यांनी घेतल्याने या महिलांचा आनंद द्विगुणित झाला. यावेळी कृषीमंत्र्यांनी कृषी सखी, प्रगतिशील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा व सूचना जाणून घेतल्या. याप्रसंगी नैसर्गिक शेतीत चांगले काम केलेल्या शेतकऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विभागाने तयार केलेल्या नैसर्गिक शेतीविषयक तीन पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.
No comments:
Post a Comment