दिलखुलास’ कार्यक्रमात सायबर सुरक्षा विषयावर
पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची मुलाखत
मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘सायबर सुरक्षा अभियान व जनजागृती’ या विषयावर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. 6, मंगळवार दि. 7, बुधवार दि. 8 आणि गुरुवार दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवर ऐकता येणार आहे. ही मुलाखत सहायक संचालक वृषाली मिलिंद पाटील यांनी घेतली आहे.
डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियामुळे जीवनमान अधिक सुलभ झाले आहे, परंतु त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचे आव्हानही गंभीर स्वरुपात वाढत आहे. यासाठी नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यावर शासन सातत्याने भर देत आहे. याच अनुषंगाने डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वांसाठी सुरक्षित सायबर व्यवहार सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत 25 सप्टेंबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ हे अभियान राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत देशभरात सायबर सुरक्षा जनजागृती महिना साजरा केला जात आहे. त्याच अनुषंगाने सायबर सुरक्षा अभियानाद्वारे नागरिकांना जागरुक करण्यासाठी सुरु असलेले उपक्रम, सायबर धोके व घ्यावयची दक्षता, ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना पाळावयाचे नियम तसेच सोशल मीडिया हाताळताना घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
No comments:
Post a Comment