Saturday, 11 October 2025

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील प्रमुख १४ फळपिके

 मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील प्रमुख १४ फळपिके आणि सर्व प्रकारच्या फुलांसाठी उत्पादन ते ग्राहकांपर्यंत एकात्मिक मूल्य साखळी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्ये शेतकरी उत्पादक संस्थानिर्यातदारप्रक्रिया उद्योगलघु व मध्यम उद्योजकस्वयंसहाय्यता गट आणि वित्तीय संस्था यांचा सक्रिय सहभाग आहे. मॅग्नेट प्रकल्पामुळे राज्यात गुंतवणूकमूल्यवर्धन आणि रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे. मॅग्नेट २.० या विस्तारित टप्प्यांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारपेठआधुनिक तंत्रज्ञानपॅकेजिंग-ब्रॅंडिंगकार्बन क्रेडिट्ससमृद्धी महामार्गावरील कृषी कॉरिडॉर आणि संस्था बळकटीकरण या घटकांचा समावेश असलेला आराखडा आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. त्याचबरोबर आशियाई विकास बँकेने महाराष्ट्रासाठी सातत्याने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत भविष्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्याचा विश्वास व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi