कापूस खरेदी नोंदणी सुलभ, जलद होण्यासाठी
ॲग्रीस्टॅकच्या माहितीचा वापर करा
- पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. १४ : राज्यामध्ये सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यात येते. या खरेदीसाठी शेतकऱ्यांची 'किसान कपास ॲप' वर नोंदणी सुरू झालेली आहे. ही नोंदणी अधिक सुलभ आणि जलद गतीने होण्यासाठी कृषी विभागाकडील 'ॲग्रीस्टॅक पोर्टल' ची आधार संलग्न माहिती उपयोगात आणावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
राज्यात होणाऱ्या किमान हमीभावाने कापूस खरेदी नोंदणी आणि खरेदीच्या नियोजनासाठी मंत्रालयात मंत्री पणन जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
No comments:
Post a Comment