आत्मसमर्पणाचे धोरण आणि पुनर्वसनाची ग्वाही
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आत्मसमर्पण करणाऱ्यांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. संविधानाचा आदर करेल, त्याच्या जीवनात सकारात्मक बदल होईल असा संदेश आम्ही आत्मसमर्पितांच्या पुनर्वसनातून देऊ, आत्मसमर्पण केलेल्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात येईल. यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्यांना येथील उद्योगांमध्ये प्रशिक्षण देऊन नोकरी देण्यात आली असून, भविष्यातही रोजगार देऊन पुनर्वसन करण्यात येईल. सर्व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनासाठी एकत्रितपणे एकूण ३ कोटी १ लाख ५५ हजार रुपये देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment