चंद्रपूर आणि गडचिरोली हा परिसर इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून तयार होत आहे. त्यामुळे दीड लक्ष लोकांना रोजगार मिळणार आहे. पर्यावरणाचे संतुलन राखून हा विकास करायचा आहे. औद्योगिकरणासोबतच चंद्रपूरने पर्यावरण संतुलन राखले, असा संदेश गेला पाहिजे. कौशल्य विकास आणि रोजगारावर भर देऊन 100 टक्के स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी व्यवस्था उभी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
50 कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वीरीत्या राबवली असल्याने यावेळी देखील चंद्रपूरने वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट गाठावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली. संपूर्ण भारतात केवळ महाराष्ट्र राज्याने ग्रीन कव्हर वाढवले असून परिसर नैसर्गिकरित्या समृद्ध केला आहे. मात्र आता संपूर्ण महाराष्ट्राचे वनक्षेत्र 33 टक्क्यांच्या वर नेण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने खनिज विकास निधीतून अतिशय चांगले काम केल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी तर आभार जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मानले.
000
No comments:
Post a Comment