संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र
अकोल्यात स्थापण्यासाठी समिती नेमावी
- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
मुंबई, दि. ९ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरू करण्याच्या कार्यवाहीसाठी तीन सदस्यीय समिती नेमावी. या समितीने उपकेंद्रासाठी योग्य जागेची पाहणी करून सविस्तर आराखडा सादर करावा, असे निर्देश सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभागाची बैठक झाली. राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार रणधीर सावरकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, सहसचिव संतोष खोरगडे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, विद्यापीठाचे रजिस्ट्रार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment