विदर्भ, तापी खोरे विकास महामंडळा अंतर्गत मान्यता मिळालेल्या
सिंचन प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करा
- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
नियामक मंडळाच्या बैठकीत विविध विषयांना मान्यता
मुंबई, दि.१५ :- वरखेडे लोंढे मध्यम सिंचन प्रकल्पाचे काम वेगात पूर्ण झाले असून त्या पद्धतीने विदर्भ, तापी खोरे विकास महामंडळा अंतर्गत मान्यता मिळालेल्या सिंचन प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश जलसंपदा ( विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
मंत्रालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या आणि तापी पाटबंधारे महामंडळाच्या विविध कामांना मान्यता देण्यात आली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत बोरकर यासह विविध क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी विविध सिंचन प्रकल्पातील कामांचा मंत्री महाजन यांनी आढावा घेतला.
मंत्री महाजन म्हणाले, नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या कामांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार असल्याने ही कामे गतीने व निर्धारित वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे.
यावेळी तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील बोदवड सिंचन योजना, वाघूर प्रकल्प, वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्प, कुऱ्हा वडोदा हा मुक्ताईनगर तालुक्यातील प्रकल्प , एरंडोल तालुक्यातील अंजनी प्रकल्प तसेच गिरणा नदीवरील नवीन बंधारे यासह विविध सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत पेंच प्रकल्पाच्या डावा मुख्य कालवा व उजवा कालवा मधील अस्तरीकरण व दुरुस्ती, निम्न वर्धा प्रकल्पाच्या वर्धा नदीवरील वरुड ते धनोडी रस्त्याच्या मुलाचे काम, निम्न पैनगंगा प्रकल्पातील 138 भूधारकांच्या अतिप्रदान रक्कम वसुली न करणे बाबत, सुरेवाडा उपसा सिंचन योजना, निम्न पेढी प्रकल्पातील पुनर्वसित गावठाण येथील बांधकामा करता अनुग्रह अनुदान, लखमापूर लघु पाटबंधारे प्रकल्प यासह विविध प्रस्ताव व प्रकल्पांच्या मान्यतेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी
No comments:
Post a Comment