येत्या चार वर्षात मुंबईतील चित्रपट नगरीचा कायापालट करणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· 'फिक्की फ्रेम्स - अ सिल्वर जुबली ऑफ व्हिजन' मुलाखत प्रसंगी केले आश्वस्त
· सायबर क्राईम विरोधात "डिजिटल वॉरफेअर" मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला आवाहन
· मराठी नाटक व सिनेमा आशयघन दर्जेदार; मराठी चित्रपटांना चांगले दिवस
मुंबई, दि. 7 :- मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था संपूर्ण विकसित झाली असून मुंबई चित्रनगरीचा येत्या चार वर्षात संपूर्णपणे कायापालट करण्यात येईल. चित्रपट क्षेत्रासाठी निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंत आवश्यक सुविधासह चित्रपटनगरीचा हा विकास असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
फिक्की फ्रेम्स - अ सिल्वर जुबली ऑफ व्हिजन' कार्यक्रमात अभिनेते अक्षय कुमार यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी आणि चित्रनगरीच्या विकासाबाबत प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
No comments:
Post a Comment