Tuesday, 28 October 2025

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत मिळणार

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांना

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत मिळणार

 

राज्यातील महापालिकानगरपरिषदानगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी तसेच ग्रामपंचायतपंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मिळणार आहे. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयानुसार आता मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९आणि महाराष्ट्र नगरपरिषदानगर पंचायती आणि  औद्योगिक नगरी अधिनियम१९६५ मध्ये  सुधारणा  करण्यात येईल. तसेच तत्पूर्वी त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल.

तर ग्रामपंचायतपंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम१९६९ मधील तरतूदीत सुधारणा करण्यात येईल.

 या अनुषंगानेही महाराष्ट्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत देणेअध्यादेश २०२५ काढण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही दोन्ही अध्यादेश राज्यपाल महोदयांच्या मान्यतेने काढण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi