Thursday, 16 October 2025

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात

 पालकमंत्री पालकमंत्री गोरे म्हणालेसोलापूरचे नागरिक मुंबई विमानसेवेसाठी अनेक वर्षापासून प्रतिक्षा करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे या विमानसेवेला प्रारंभ होत आहे. नुकत्याच झालेल्या महापुराच्या संकटावेळी प्रशासनाने चांगली कामगिरी करून जिवीतहानी होऊ दिली नाही. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामुळे शासन आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पूरग्रस्ताच्या घरी दिवाळी साजरी होण्यासाठी आवश्यक साहित्य देण्यात येत आहे. ८७२ कोटी रुपयाचे शहराच्या अंतर्गत जलवाहिनीचे काम होणार आहेअसेही गोरे म्हणाले. सोलापूर-तिरुपती विमानसेवा लवकर सुरू करावी आणि शहर विकास आराखड्याचे काम लवकर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरात होत असलेल्या सुधारणांमुळे औद्योगिक विकासाला गती मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi