Saturday, 18 October 2025

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अपघाताची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी

 नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अपघाताची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी

-    उपमुख्यमंत्री अजित पवार

 

अपघातातील जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदतउपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश

 

मुंबई दि.18 : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चांदशैली घाटात पिकअप गाडी पलटी होऊन झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत तसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावीयासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माता-भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगात शासन त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहेअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. 

 

      आपल्या संदेशात अजित पवार म्हणाले कीया अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. पोलिसांनी जखमींना पिकअप व्हॅनमधून बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले.जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत आणि उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्य शासन या कठीण काळात अपघातग्रस्त नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या  पाठीशी उभे असल्याचेउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi