मंत्री राणे यांनी बाल्टिक समुद्रावर कॅन्डेला सी 8 आणि पी 12 या अत्याधुनिक बोटींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या बोटी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित असून पाण्यावरून ग्लाइड होतात, त्यामुळे त्या वेगवान, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक आहेत. लवकरच पी 12 बोट मुंबईत दाखल होणार असून, यामुळे राज्यातील जलवाहतुकीत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.
या भेटीदरम्यान कॅन्डेला कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुस्ताव हसेलकोग तसेच मुख्य व्यवसाय अधिकारी नकुल विराट यांनी कंपनीच्या तांत्रिक नवकल्पना आणि उत्पादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा मंत्री राणे यांना दिला. महाराष्ट्रात कॅन्डेलाचे उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबतही प्राथमिक चर्चा करण्यात आली.
०००००
No comments:
Post a Comment