Sunday, 19 October 2025

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत माझगाव डॉक येथे दोन नौकांचे 27 ऑक्टोबर रोजी उद्घाटन

 महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत माझगाव डॉक येथे दोन नौकांचे 27 ऑक्टोबर रोजी उद्घाटन

 

मुंबईदि. १७ : राज्यातील सात सागरी जिल्ह्यांतील १४ मच्छीमार सहकारी संस्थांची निवड या योजनेंतर्गत करण्यात आली होती. प्रस्ताव प्रक्रियेनंतर जय मल्हार मत्स्यव्यवसाय विविध कार्यकारी संस्थामुंबई शहर यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तयारी दर्शविली होती. एनसीडीसी यांच्या निर्देशानुसार या नौकांचे बांधकाम उडुपी कोची शिपयार्ड लिमिटेडमालपे (कर्नाटक) येथे करण्यात आले आहे.

प्रत्येक नौका १८ ते २२ मीटर लांबीची असून४०० ते ६०० एचपी इंजिन क्षमतास्टील हल बांधणीरेफ्रिजरेटेड फिश होल्डतसेच जीपीएसइको साऊंडरव्हीएचएफ रेडिओएआयएसरडार यांसारखी अत्याधुनिक नेव्हिगेशन व संप्रेषण प्रणाली यामध्ये बसविण्यात आली आहेत. या नौका १० ते १५ दिवसांच्या मासेमारी मोहिमेसाठी उपयुक्त असूनविशेषतः ट्यूना लाँगलाईन व गिलनेट ऑपरेशनसाठी योग्य आहेत.

या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹२०.३० कोटी असून त्यामध्ये एनसीडीएस कर्ज साहाय्य ₹११.५५ कोटीकेंद्र हिस्सा ₹४.०३ कोटीराज्य हिस्सा ₹२.६८ कोटी व लाभार्थी संस्था हिस्सा ₹१२.०३ कोटी इतका आहे.

या नौकांच्या उद्घाटनामुळे महाराष्ट्रात खोल समुद्रातील शाश्वत मासेमारीचा नवा अध्याय सुरू होणार आहे. यामुळे किनारी मासेमारीवरील दबाव कमी होईलट्यूना मासेमारीला चालना मिळेल आणि ब्लू इकॉनॉमी बळकट होईल.

हा प्रकल्प डीप सी ट्यूना फ्रॉम महाराष्ट्र या उपक्रमाशी निगडीत असूनसागरी निर्यातीचे मूल्य वाढविण्यासह मच्छीमारांच्या उत्पन्नातही वाढ घडवेल. आधुनिक तंत्रज्ञानशीत साखळी सुविधा आणि सहकारी व्यवस्थापनामुळे हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी विशेषतः एसडीजी १२ आणि एसडीजी १४ - सुसंगत ठरतो.

या निमित्ताने महाराष्ट्राच्या सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्रात शाश्वततानवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मासेमारी सुविधांचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi