Monday, 1 September 2025

मानसिक आरोग्य व कल्याण मापन पट्टी (Psychological Well-Being Scale) यांसारख्या

 महिला व बालविकास विभाग (WCD) सोबतच्या फेब्रुवारी २०२३ मधील सामंजस्य करारानंतर हा प्रकल्प मुंबईपुणेठाणेनागपूर आणि नाशिक या विभागांमध्ये राबवला जात आहे. एकूण १९ बालसंगोपन संस्थांना पाच मानसशास्त्रज्ञाच्या टीमकडून सेवा दिल्या जात आहेत. या प्रकल्पांतर्गत मानसशास्त्रज्ञ रोटेशन पद्धतीने सीसीआयला भेट देतातस्तिथीपरत्वे समुपदेशन करतातमुलांचे मानसिक आरोग्य स्क्रिनिंग करतात आणि गरजेनुसार थेरपी सेवा पुरवतात.  याशिवाय गंभीर प्रकरणांमध्ये बालकल्याण समिती (CWC) आणि किशोर न्याय मंडळाला (JJB) तज्ज्ञांचे सहकार्य दिले जाते. थेरपिस्ट काही मुलांच्या आरोग्य आणि मानसिक परिस्थितीनुसार त्यांचे तणाव मापन पट्टी (Stress Scale), आक्रमकता मापन पट्टी (Aggression Scale), स्थिती-गुणधर्म चिंतामापन चाचणी (State Trait Anxiety Test), मानसिक आरोग्य व कल्याण मापन पट्टी (Psychological Well-Being Scale) यांसारख्या साधनांद्वारे सखोल परीक्षण केले जाते.

मुलांच्या कुटुंबियांनाही समुपदेशनाची सुविधा दिली जाते.  पालकांचे समुपदेशन केल्याने मुले घरी परतल्यावर त्यांना  पुर्वीप्रमाणे मोकळे वातावरण मिळेल हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.  मासूम प्रकल्प हा राज्यातील बालसंगोपन संस्थांमध्ये मानसिक आरोग्य सेवांना बळकटी देणारा ठरला असून मुलांच्या पुनर्वसन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi