मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा
मच्छीमार समाजासाठी नवे पर्व
मुंबई, दि. ४ : राज्य शासनाने मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कृषी क्षेत्रातील सर्व सुविधा, योजनांचा लाभ आणि बँक कर्जासंबंधी सवलती मिळणार आहेत.
महाराष्ट्रात ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा असून, कोकण किनारपट्टीपासून विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्यपालनापर्यंत लाखो कुटुंबे थेट मत्स्यव्यवसायावर अवलंबून आहेत. आतापर्यंत कृषी आणि मत्स्यव्यवसाय या दोन क्षेत्रांत वेगळे धोरणात्मक निकष असल्याने मच्छीमारांना अनेक सवलतींपासून वंचित राहावे लागत होते. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्ज, अनुदान, विमा संरक्षणाच्या योजनांचा लाभ मच्छीमारांना मिळत नव्हता.
No comments:
Post a Comment