Friday, 19 September 2025

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचे आवाहन करण्यातladkibahin.maharashtra.gov.in या

 लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचे

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आवाहन

 

मुंबई, दि. १९ : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभसुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे, असे आवाहन महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले आहे.

 

मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी येत्या दोन महिन्यांत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन केवायसी करणे बंधनकारक असूनयासाठी ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले. या माध्यमातून लाडक्या बहिणींना योजनेंतर्गत लाभ वेळेत व अचूक मिळण्यास मदत होणार आहे.

 

या केवायसीमुळे महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या इतर योजनांचा लाभही प्रत्येक पात्र महिलांपर्यंत पारदर्शकपणे मिळणार असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi