आठव्या ‘राष्ट्रीय पोषण माह’साठी यंदा केंद्र शासनाने "लठ्ठपणा कमी करणे, बालपणाची काळजी व शिक्षण (ECCE) / पोषणही शिक्षणही, अर्भक व बालक आहार पद्धती (IYCF), पुरुष सहभाग, व्होकल फॉर लोकल व स्वावलंबन, एकत्रित कृती व डिजिटायझेशन" या सहा प्रमुख थीम निश्चित केल्या आहेत. बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस या पुस्तिकेचे प्रकाशन तसेच नवनियुक्त अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास, नगरविकास, आदिवासी विकास व इतर विभागांच्या समन्वयाने व अभिसरणाच्या माध्यमातून पोषण अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी ग्रामीण, आदिवासी व नागरी क्षेत्रातील एकूण ५५३ बाल विकास प्रकल्पातील एक लाख १० हजार ६२९ केंद्रात राबविण्यात येते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील २५ लाख ८२ हजार ३३० बालके, ३ ते ६ वयोगटातील २४ लाख ७४ हजार ४१७ बालके, ४ लाख ३२ हजार २३४ गरोदर महिला व ४ लाख २३ हजार ७५६ स्तनदा माता या योजनेचा लाभ घेत आहेत.
No comments:
Post a Comment