हाफकिन बायो-फार्मा कामगारांच्या प्रश्नांवर
व्यवस्थापनाने तात्काळ उपायोजना करावी
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश
मुंबई, दि. ११ : पिंपरी चिंचवड येथील हाफकिन बायो-फार्मामधील कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात व्यवस्थापनाने तात्काळ उपायोजना करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. या कंपनीमधील कामगारांच्या विविध समस्यांसंदर्भात उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली. या बैठकीस ‘हाफकिन’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील महेंद्रकर, कामगार प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वेतनाव्यतिरिक्त थकीत देयके, निवासस्थान नूतनीकरण, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, पदोन्नती अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. कामगारांची थकीत देणी, निवासस्थान नुतनीकरण टेंडर प्रक्रिया, यासंदर्भात व्यवस्थापनाने माहिती त्वरित सादर करावी. कामगारांच्या निवासस्थानाच्या देखभाल दुरुस्तीची कामे प्राधान्याने करण्याचे निर्देश उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिले.
No comments:
Post a Comment