Sunday, 14 September 2025

हिंसाचाराविरूद्ध महिलांना संरक्षण व समुपदेशनासाठी ‘वन स्टॉप सेंटर’ कार्यरत

 हिंसाचाराविरूद्ध महिलांना संरक्षण व समुपदेशनासाठी

‘वन स्टॉप सेंटर’ कार्यरत

 

मुंबईदि. १२ : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालविकास विभाग विविध योजना राबवित असूनमहिलांना सुरक्षितताआर्थिक स्थैर्यमानसिक आधार व कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जात आहे. महिलांवर होणाऱ्या सर्व प्रकारच्या हिंसाचाराविरुद्ध त्वरित मदत मिळावी यासाठी राज्यभर ‘वन स्टॉप सेंटर’ कार्यरत असूनसध्या ३६ जिल्ह्यांमध्ये ५५ केंद्रे सुरु आहेत.

या केंद्रांद्वारे शारीरिक-मानसिक अत्याचारआर्थिक छळसामाजिक अवहेलना झालेल्या महिलांना एकाच छताखाली कायदेशीर सल्लावैद्यकीय साहाय्यपोलीस मदतमानसोपचार व समुपदेशनतात्पुरता निवारा तसेच पुनर्वसनासाठी शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जातो. पीडित महिलांना कमाल पाच दिवस तात्पुरते राहण्याची सुविधा दिली जाते.

या योजनेअंतर्गत बांधकामकर्मचाऱ्यांचे मानधनविमा व अत्याचार पीडितेच्या आकस्मिक खर्चासाठी १०० टक्के अनुदान केंद्र शासनामार्फत उपलब्ध आहे. नाशिकअहिल्यानगरपुणेसातारानांदेडअकोलाअमरावतीनागपूरजळगावचंद्रपूरयवतमाळ व ठाणे येथे नवीन केंद्रे सुरू झाली आहेत. उर्वरित १४ जिल्ह्यांतील केंद्रांसाठी बांधकाम प्रक्रिया सुरू असूनसद्यस्थितीत जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करून दिलेल्या जागेत सेवा दिली जात आहे.

जानेवारी २०२५ पासून आजपर्यंत राज्यातील ‘वन स्टॉप सेंटर’मधून ७,०६३ महिलांना सहाय्य व समुपदेशन करण्यात आले. यामध्ये कौटुंबिक हिंसाचारमालमत्तेविषयक वादलैंगिक छळलिंगभेदसायबर गुन्हे व अन्य प्रकरणांचा समावेश असूनपीडित महिलांना मानसिक आधारासह नव्याने जीवन जगण्यासाठी आधार देण्याचे काम या केंद्रांमार्फत केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi