Thursday, 18 September 2025

ह्युंडाई कंपनीची या ठिकाणी आलेली गुंतवणूक हेच दर्शवते. काही वर्षांमध्ये झालेली गुंतवणूक पाहिली तर

 छत्रपती संभाजीनगर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी २७०० कोटी रुपयांची योजना सरकारने मंजूर केली आणि महानगरपालिकेचा ८०० कोटीचा हिस्सा देखील भरण्याचा निर्णय घेतला. समृद्धी महामार्ग आणि डीएमआयसीमुळे आज सर्व गुंतवणूकदारांना अतिशय महत्त्वाचे स्थान ज्याला आपण आवडीचे स्थान म्हणू शकतो ते आता छत्रपती संभाजीनगर झाले आहे. ह्युंडाई कंपनीची या ठिकाणी आलेली गुंतवणूक हेच दर्शवते. काही वर्षांमध्ये झालेली गुंतवणूक पाहिली तर आता छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक वाहनांच्यासाठी देशाची राजधानी बनते आहे.

लातूरची रेल्वे कोच फॅक्टरी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. जवळपास १४ हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे.  छत्रपती संभाजीनगरच नाही तर मराठवाड्याच्या इतर भागात जी कामे सुरु आहेत ती विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत. अहिल्यानगर पासून बीड पर्यंतचे रेल्वेचे स्वप्न हे आज पूर्ण करण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होत आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे सरकार मराठवाड्याच्या हितासाठी आणि मराठवाड्याच्या प्रगतीसाठी काम करत राहील आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांच्या सूचना या आमच्यासाठी अत्यंत मोलाच्या ठरतीलअसा विश्वासही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींची भेट घेऊन त्यांना  मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीयनागरिकसर्व विभागांचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi