Friday, 12 September 2025

पश्चिम विभागीय राज्यांमध्ये पटकावली ‘अ’ श्रेणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऊर्जा क्षेत्रातील यंत्रणांचे अभिनंदन

 ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीत महाराष्ट्र अव्वल

पश्चिम विभागीय राज्यांमध्ये पटकावली ’ श्रेणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऊर्जा क्षेत्रातील यंत्रणांचे अभिनंदन

 

मुंबईदि. ११ :- वीज पुरवठा आणि एकूणच ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीत महाराष्ट्राने बाजी मारली आहे. देशात पश्चिम विभागातील राज्यांमध्ये महाराष्ट्राने याबाबतीत अव्वल स्थान पटकावले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा ऊर्जा विभागया क्षेत्रात कार्यरत कंपन्याविविध यंत्रणाचे तसेच राज्यातील वीज ग्राहकांचे अभिनंदन केले आहे. या मानांकनामुळे महाराष्ट्राची ऊर्जा क्षेत्राची वाटचाल योग्य दिशेने आणि दमदारपणे सुरु आहेयावर देखील शिक्कामोर्तब झाले आहेअसे कौतुकोद्गारही त्यांनी काढले आहेत.

भारत सरकारची आरईसी’ महारत्न कंपनी आणि पॉवर फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी विविध निकषांवर आधारित मानांकन जाहीर केले आहे. यात महाराष्ट्राने ९३ गुण मिळवून, ‘’ श्रेणी पटकावली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi