महाराष्ट्र शासनाचा विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार;
रू.८०,९६२ कोटीं गुंतवणूक तर ४०,३०० रोजगार निर्मिती
· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या उपस्थितीत नऊ सामंजस्य करार
मंबई, दि. १९ :- मुंबईतील गोरेगाव येथे एआयआयएफए (आयफा) आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे नऊ कंपन्यांशी ८०,९६२ कोटी रूपयांचे सामंजस्य करार स्वाक्षरित झाले. या करारामुळे राज्यात ४० हजार ३०० रोजगार निर्मिती होणार आहे.
गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, सातारा आदी जिल्ह्यांत हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. गडचिरोलीत सुमेध टुल्स प्रा. लि. आणि हरिओम पाइप इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पांमुळे ५,५०० रोजगार उपलब्ध होणार असून ५,१३५ कोटींची गुंतवणूक होणार आहे.
No comments:
Post a Comment