यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनची
मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
यवतमाळ, दि. २९ (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ दौऱ्याच्या सुरुवातीला यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, माजी मंत्री मदन येरावार, आमदार राजू तोडसाम, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, माजी खासदार रामदास तडस आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी रोपटे देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले व पोलीस स्टेशनची माहिती दिली. पोलीस प्रशासनातर्फे 27 लाख 11 हजार 111 रुपयांच्या निधीचा धनादेश पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावे मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपणही करण्यात आले. वीर शहीद जवान पत्नी सुनिता प्रकाश विहीरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमिनीचा पट्टा वाटप करण्यात आला.
No comments:
Post a Comment