Thursday, 11 September 2025

शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टिम’वर होण्यासाठी प्रारूप तयार करावे

 शिष्यवृत्ती वितरण ऑटो सिस्टिमवर होण्यासाठी प्रारूप तयार करावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

•          नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

•          राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक

 

मुंबईदि. १० : राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावीयासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरण प्रणालीप्रमाणेच शिष्यवृत्ती वितरण ऑटो सिस्टमवर होण्यासाठी प्रारूप तयार करावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये महाविद्यालये सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीची २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत् आराखड्याची बैठक मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत इरादा पात्र प्राप्त महाविद्यालय ७३९ होती त्यापैकी ५९३ महाविद्यालयांना अंतिम मान्यता  देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची (माहेड) बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीचे (New College Permission System-NCPS) उद्घाटन करण्यात आले. या https://htedu.maharashtra.gov.in/NCPS संकेतस्थळावरून इच्छुक संस्थांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi