राज्यस्तरीय सुकाणू समितीची बैठक संपन्न
लघुसिंचन व जलसाठा योजनांच्या प्रगणनेला गती द्यावी
- सचिव गणेश पाटील
मुंबई, दि. २६ : केंद्र शासनाकडून राष्ट्रव्यापी लघुसिंचन योजनांची सातवी प्रगणना आणि जलसाठ्यांची दुसरी प्रगणना करण्यात येत असून राज्यातील प्रगणनेसाठी आराखडा तयार करुन प्रगणनेस गती द्यावी, अशा सूचना सुकाणू समितीचे अध्यक्ष तथा मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील यांनी दिल्या.
राज्यस्तरीय सुकाणू समितीची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मृद व जलसंधारण आयुक्त श्री. खपले व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच विभागीय अधिकारी तसेच राज्यस्तरीय सुकाणू समितीचे सदस्य दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
बैठकीत लघु सिंचन योजनांची सातवी प्रगणना व जलसाठा योजनांची दुसरी प्रगणना निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रगणकांची नेमणूक करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे आणि जिल्हास्तरावर आराखडे तयार करून ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण प्रगणना पूर्ण करावी.
No comments:
Post a Comment