श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी
मुंबई, दि. ११ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला.
श्रीगणेशा आरोग्याचा हा उपक्रम गणेशउत्सव काळात राबविण्यात आला होता. त्याद्वारे मराठवाड्यातील ९४ हजार ४५४ रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर, ४,२२४ रूग्णांना पुढील उपचाराकरिता तज्ञ डॉक्टरांकडे संदर्भित करण्यात आले. यासोबतच १,४७२ दात्यांनी रक्तदान केले.
या अभियानात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यभरातील मोठ्या संख्येतील गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला.
मराठवाडा विभागात ४,८३३ रुग्णांना ४१ कोटी ५७ लाख २१ हजार रूपयांची वैद्यकीय मदत
1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान मराठवाडा विभागात एकूण 4,833 रुग्णांना 41 कोटी 57 लाख 21 हजार रूपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :
1. छत्रपती संभाजीनगर – 950 रूग्णांना – 08 कोटी 06 लाख 43 हजार
2. जालना – 551 रूग्णांना – 04 कोटी 65 लाख 05 हजार
3. बीड – 888 – 7 कोटी 73 लाख 58 हजार
4. लातूर – 581 – 4 कोटी 84 लाख 55 हजार
5. धाराशिव – 354 – 3 कोटी 5 लाख 61 हजार
6. नांदेड – 483 – 4 कोटी 3 लाख 52 हजार
7. परभणी – 802 – 6 कोटी 91 लाख 37 हजार
8. हिंगोली – 224 – 1 कोटी 90 लाख 10 हजार
No comments:
Post a Comment