सायबर कोविडपासून बचावासाठी सायबर स्वच्छतेची गरज - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
सायबर सुरक्षा ही केवळ संस्थांची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सायबर कोविडपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सायबर स्वच्छतेचा अवलंब करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.
एआयच्या युगात डेटा सर्वात मौल्यवान ठरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला डेटा सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. अति-सामायिकरण टाळणे, समाज माध्यमांवर जास्त माहिती न टाकणे, तसेच 'जिओस्पाय'सारख्या अल्गोरिदमपासून सावध राहणे गरजेचे असल्याचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.
या कार्यक्रमात सेबीचे कार्यकारी संचालक अविनाश पांडे, विविध उद्योगांचे प्रतिनिधी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment