बांबू : शाश्वत विकासाचा कल्पवृक्ष
हरित आच्छादन वाढवावे लागणार आहे.आणि दुसऱ्या बाजूला जमिनीच्या पोटातले जीवाश्म इंधन वापरणे बंद करावे लागणार आहे. आणि हे केले नाही तर एक किलो दगडी कोळसा किंवा एक लिटर पेट्रोल जाळून निर्माण होणारे कार्बन उत्सर्जन संपण्यासाठी पुढील शंभर वर्षे देखील कमी पडतील. याला उत्तर एकच आहे की जमिनीच्या पोटा खालील डिझेल आणि पेट्रोल कोळसा वापरणे बंद करणे.
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी जुलै 2023 मध्ये एका निवेदनात असे म्हटले होते की, "जागतिक तापमानवाढीचे युग (era of global warming) संपले आहे, आणि आता जागतिक होरपळीचे युग (era of global boiling) सुरू झाले आहे. आता तातडीच्या उपायांची गरज आहे" त्यांनी हे विधान 2023 मध्ये जगभरात झालेल्या अभूतपूर्व उष्णतेच्या लाटा, जंगलातील आगी, आणि इतर हवामान-संबंधित आपत्तींच्या पार्श्वभूमीवर केले होते. 2025 पर्यंत, ही परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे, आणि तातडीच्या उपाययोजनांची गरज त्यांनी वारंवार अधोरेखित केली आहे.एक लढाई जीवाश्म इंधन ( Fossils Fuel) विरोधात जैवइंधन (Biofuel) अशी देखील आहे. त्यासाठी गंभीरपणे धोरणांची अंमलबजावणी करावी लागणार आहे.
बांबू हे अतिशीघ्र वेगाने वाढणारे गवत वर्गीय वनस्पती पीक आहे. काही प्रजाती (उदा., Dendrocalamus giganteus) दररोज 91 सें.मी. (36 इंच) पर्यंत वाढू शकतात. यामुळे बांबूला "टिम्बर ऑफ द ट्वेंटी-फर्स्ट सेंचुरी" असे संबोधले जाते. सामान्यतः बांबू 3-5 वर्षांत परिपक्व होतो, तर पारंपरिक झाडांना (उदा., साग, ओक) परिपक्व होण्यासाठी 20-50 वर्षे लागतात. बांबू हे डिझेल, पेट्रोल आणि कोळशाला पर्याय ठरणारे पीक आहे. त्याचबरोबर जंगलतोड रोखणे, ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, उष्मा कमी करणे अशा सगळ्याच वातावरण बदलाच्या संकटांना रोखणारा कल्पवृक्ष म्हणजे बांबू होय. एक ब्रीद वाक्य तयार केले आहे ते सांगतो की 'Save Earth with Bamboo'.
No comments:
Post a Comment