सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीत महाराष्ट्राचा पुढाकार
- मंत्री ॲड.आशिष शेलार
‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ मोहिमेचा शुभारंभ
मुंबई, दि. २५ : डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र हे जगातील डिजिटल प्रगतीशील राष्ट्रासाठी आदर्श ठरत आहे. सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असल्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.
डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी व सर्वांसाठी सुरक्षित सायबर व्यवहार निर्माण करण्यासाठी डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत आयोजित 'रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ या मोहिमेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) येथे आज करण्यात आले.
यावेळी मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, २०१६ मध्ये सुरू केलेल्या महाराष्ट्र सायबर विभागाच्या प्रयत्नांबरोबरच राज्याने ‘गोल्डन डेटा प्रकल्प’ सुरू केला आहे. या प्रकल्पात १२ कोटी प्रमाणित नागरिकांची माहिती नोंदवली असून, नागरिकांना प्रत्येक व्यवहारासाठी वेगवेगळे पासवर्ड किंवा प्रमाणपत्रांची गरज भासणार नाही. हा प्रकल्प सायबर सुरक्षेसाठी एक मोठे बळ ठरणार आहे.
सायबर सुरक्षा ही केवळ शहरी भागापुरती मर्यादित नसून ग्रामीण व निम्न-शहरी भागातील नागरिकांनाही याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक संस्था व शासनाने मिळून यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे डिजिटल रेजिलियन्स सिस्टीम उभारण्याची ही योग्य वेळ आहे. उद्योग क्षेत्राने गुंतवणूक करावी, शैक्षणिक संस्थांनी अभ्यासक्रम तयार करावेत आणि शासनाने सक्षम व्यवस्था उभारावी, तसेच नागरिकांनी स्वतः जागरूक होणे आवश्यक असल्याचे मत मंत्री ॲड. शेलार यांनी व्यक्त केले
No comments:
Post a Comment