दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानने पारधी समाजाच्या विकासासाठीही मोठं काम केलं आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर काम करून गुन्हेगार समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समाजाचं परिवर्तन घडवलं आहे. पंडित दीनदयाळजींनी समाजासाठी जे कार्य केलं, ते कोणत्या पुरस्कारासाठी नव्हतं. त्यांचे 'विचार' अमर आहेत. जरी त्यांची हत्या झाली, तरी त्यांचा विचार अधिक वेगाने पसरला आणि आज तोच विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवला जात आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
प्रारंभी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मारकस्थळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन पंडित दीनदयाळजींच्या पुतळ्यास पुष्प व खादीचा हार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी मूर्तीकार सुजीत गौड व पत्नी स्वाती सुजीत गौड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment