मुख्यमंत्र्यांनी ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर राबविण्यास दिलेल्या परवानगीचे स्वागत करताना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत होणाऱ्या उपचारांसाठी नागरिकांनी खासगी रुग्णालयांऐवजी शासकीय रुग्णालयांना प्राधान्य द्यावे, यासाठी आवश्यक सुविधा, वातावरण आणि उपचाराची गुणवत्ता शासकीय रुग्णालयांत असली पाहिजे. यामुळे शासकीय योजनांचा निधी शासकीय रुग्णालयांकडे वळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल. शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा व दर्जेदार औषधसाठा ठेवला गेला पाहिजे, औषध खरेदी प्रक्रियेत गैरप्रकार झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. औषधांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी लवकरच स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल, असेही आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.
या बैठकीला आरोग्यसेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, आरोग्यसेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक आणि वरिष्ठ अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
No comments:
Post a Comment