बांबूमुळे शेतकऱ्यांना स्थैर्य मिळेल - राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष श्री. पटेल म्हणाले की, बांबू हे कल्पवृक्ष असून बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना स्थैर्य मिळणार आहे. बांबू हा केवळ पर्यावरणाचा संरक्षक नाही, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनू शकतो. राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी बांबूचे कुंपण लावण्यासंबंधी विचार करावा. तसेच वनलगतच्या शेतीच्या कडेला कटांग जातीचे बांबू लावल्यास वन्यजीवांचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
ओरोकेम टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक व मुख्य तांत्रिक अधिकारी अनिल ओरोसकर, आफ्रिकन एशियन ग्रामीण विकास संस्थेचे महासचिव मनोज नार्देसिंग, खगन बोरा, दिनेश शर्मा, देवराव मुळे आदी उपस्थित होते. यावेळी नामदेव कापसे लिखित बांबू लागवड काळाजी गरज या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले.
No comments:
Post a Comment