मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्रात जागतिक स्तरावरील जलमार्ग विकसित केले जातील व जलवाहतुकीला प्राधान्य देण्यात येईल. यामुळे वेळ व इंधनाची बचत होऊन अर्थव्यवस्था सक्षम होईल. मुंबईमध्ये लवकरच वॉटर मेट्रो सुरू होणार असून त्यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होईल. मुंबई व कोकण भाग जलवाहतुकीने जोडला जाणार असून रो-रो सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. जहाज बांधणी उद्योगात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात असून शासन गुंतवणूक व दररचनेच्या बाबतीत सहकार्य करेल, असेही मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
बंदर व जहाज वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांनी या परिषदेत बोलताना सांगितले की, बंदरे आणि जहाज वाहतूक क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देते. महाराष्ट्रातील लहान बंदरांतून मोठ्या प्रमाणावर मालाची वाहतूक सुरू असून या क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. वाढवण प्रकल्पात राज्याचा सहभाग आहे. क्लस्टर विकास मॉडेलवर भर देऊन या उद्योगाचा विस्तार करण्यात येणार आहे.
या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राने सागरी विकासासाठी ठोस दिशा दिली असून उद्योगस्नेही धोरण, पायाभूत सुविधा आणि केंद्र व राज्य शासनाचा पाठिंबा यामुळे राज्य भविष्यात जहाजबांधणी व सागरी वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र होणार आहे.
No comments:
Post a Comment