Friday, 12 September 2025

राज्यात ५९ मोबाईल फॉरेन्सिक लॅब कार्यान्वीत; गुन्हे सिद्धतेला वेग

 राज्यात ५९ मोबाईल फॉरेन्सिक लॅब कार्यान्वीत; गुन्हे सिद्धतेला वेग

 

मुंबई, दि. १२ : सध्या पोलिसांसमोर नवनवीन गुन्ह्यांचे आव्हान उभे ठाकले आहे. दिवसागणिक गुन्ह्याचे स्वरूप बदलत आहे. गुन्हेगारांकडून गुन्ह्यासाठी होत असलेल्या नवीन संकल्पनांचा उपयोग गुन्ह्याची उकल करताना अडचणीचे ठरत आहे. बदलत्या गुन्हेगारीनुसार तपासाकरिता असलेल्या यंत्रणेतही बदल होणे आवश्यक होते. त्यानुसार जलद गतीने तपास पूर्ण होण्यासाठी ‘मोबाईल फॉरेन्स‍िक व्हॅन’ (न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा) ची सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रात २१ मोबाईल फॉरेन्स‍िक व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला आणि महाराष्ट्र देशातील मोबाईल फॉरेन्स‍िक व्हॅन सुरू करणारे पहिले राज्‍य ठरले. या लॅबचा विस्तार वाढवून २१ वरून ५९ मोबाईल फॉरेन्सिक लॅब सुरू करण्यात आल्या आहेत.  

            राज्यात मुंबई शहरातील पूर्व विभागात (चेंबूर), पश्चिम विभागात वांद्रे, उत्तर विभागात कांदिवली, मध्य विभाग भायखळा, दक्षिण विभागातील नागपाडा येथे प्रत्येकी एक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर मुंबई उपायुक्त रेल्वे स्टेशन मध्य परिमंडळात एक व्हॅन देण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई उपयुक्त परिमंडळात तीन, नागपूर उपायुक्त परिमंडळात पाच, ठाणे उपायुक्त परिमंडळात १, मीरा भाईंदर मध्ये १, पुणे १, पिंपरी चिंचवड १, सोलापूर १, नाशिक १, छ. संभाजीनगर १, अमरावती १ व्हॅनची सुविधा देण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत जळगांव जिल्ह्यात ८, पालघर १, अलिबाग १, रत्नागिरी १, कोल्हापूर १, सांगली १, सातारा १, हवेली (जि.पुणे) १, सोलापूर ग्रामीण १, अहिल्यानगर ग्रामीण १, नाशिक ग्रामीण १, धुळे शहर १, नंदूरबार १, छ. संभाजीनगर १, जालना १, लातूर शहर १, धाराशिव १, हिंगोली ग्रामीण १, नांदेड शहर १, परभणी १, बीड १, अकोला १, बुलढाणा १, नागपूर ग्रामीण १, भंडारा १, वाशिम १, अमरावती ग्रामीण १, वर्धा १, यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे १ व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे.          

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi