Monday, 29 September 2025

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार

 अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना

भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार

                                 -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 जळगावदि. २७ (जिमाका वृत्तसेवा): अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईलत्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार नाहीअशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.

 जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलजलसंपदा मंत्री गिरीश महाजनवस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेआमदार सुरेश भोळेमंगेश चव्हाणकिशोर पाटीलअमोल जावळेजिल्हाधिकारी आयुष प्रसादजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल  करणवाल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यापाचोराभडगावजामनेरमुक्ताईनगरभुसावळजळगावएरंडोल या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर मदत  दिली जाईल असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi