Friday, 12 September 2025

नागरिक केंद्रीत 'आपले सरकार २.०' पोर्टल कार्यान्वित करावे

 नागरिक केंद्रीत 'आपले सरकार २.०' पोर्टल कार्यान्वित करावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'इज ऑफ लिव्हिंगसुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे

 

मुंबईदि. ११ : नागरिकांना शासकीय सेवा व योजनांचा लाभ सहज व सुलभ पद्धतीने मिळण्यासाठी राज्य शासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करीत नागरिकांना जास्तीत जास्त सुलभ पद्धतीने योजनांचे लाभ आणि सेवा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे समग्र संस्थेसोबत आयोजित गव्हर्नन्स प्रोसेस री इंजीनियरिंगबाबत बैठक झाली. शासनाच्या संपूर्ण सेवा आणि योजनांचे लाभ ‘आपले सरकार’चा पोर्टलवरून देण्यात यावेत. या पोर्टलवर अन्य विभागांचे पोर्टल किंवा ॲप एकत्रित करावेअसे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

बैठकीस माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलारमुख्य सचिव राजेश कुमारराज्य सेवा हक्क हमी आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi