विद्यार्थ्यांना देण्यात येणारी विद्यापीठ अनुदान आयोगाप्रमाणे (UGC) अधिछात्रवृत्ती :
JRF प्रमाणे (प्रथम ०२ वर्ष) एकूण प्रती वर्ष रक्कम अधिछात्रवृत्ती UGC निकषा नुसार ५ लाख ५३ हजार ३००, एकूण प्रती माह अधिछात्रवृत्ती ४६ हजार १०८ आहे.
तसेच SRF प्रमाणे (२ वर्षानंतर पुढील ०३ वर्ष) एकूण प्रती वर्ष रक्कम अधिछात्रवृत्ती ६ लाख २९ हजार ८००, एकूण प्रती माह अधिछात्रवृत्ती ५२ हजार ४८३ देण्यात येते. अधिछात्रवृत्ती (CSMNJRF) अंतर्गत अंतिमरित्या निवड झालेल्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य हे सारथीकडून ज्या रोजी अवार्ड लेटर (Award Letter) दिले जाईल, त्या तारखेपासून पुढे पीएच.डी. करिता पाच वर्ष किंवा उमेदवार संशोधनासाठी विद्यापीठ महाविद्यालय/संस्था येथे रुजू झालेला असेल. (विद्यापीठ/महाविद्यालय/संस्थे
अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत सन २०१९ मध्ये पात्र विद्यार्थी ५०३, पीएचडी घेतलेले विद्यार्थी २४६, नोकरी लागलेले विद्यार्थी ७४ आहेत. सन २०२० मध्ये पात्र विद्यार्थी २०४, पीएचडी घेतलेले विद्यार्थी ८०, नोकरी लागलेले विद्यार्थी १८ आहेत. सन २०२१ मध्ये पात्र विद्यार्थी ५५१, पीएचडी घेतलेले विद्यार्थी ६४, नोकरी लागलेले विद्यार्थी १० आहेत. सन २०२२ मध्ये पात्र विद्यार्थी ८५१, पीएचडी घेतलेले विद्यार्थी ४, नोकरी लागलेली विद्यार्थी १ आहेत. सन २०२३ मध्ये पात्र विद्यार्थी ९६९ आहेत.
No comments:
Post a Comment