Sunday, 31 August 2025

देशातील एकूण नोंदणी गुणोत्तर (Gross Enrollment Ratio - GER) ५०% पर्यंत नेण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट

 देशाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक  धोरण  अंतर्गत भारतातील  शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देशातील एकूण नोंदणी गुणोत्तर (Gross Enrollment Ratio - GER) ५०% पर्यंत नेण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठीभारताने जागतिक दर्जाचे शिक्षण आणि संशोधन भारतातच उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत.  महाराष्ट्रातही विविध अभिनव आणि परिवर्तनशील उपक्रम शिक्षण क्षेत्रात राबविले आहेत.  यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांपर्यंत संधींची समान उपलब्धता आणि संशोधनाला चालना यावर अधिक भर देऊन गुणवत्तापूर्ण शैक्षणिक बदल करून राज्यातील शिक्षण व्यवस्था लोकाभिमुख केली  जात आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi