Thursday, 7 August 2025

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

 इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

 

मुंबई, दि. ७ : राज्यातील इतर मागास प्रवर्गविमुक्त जातीभटक्या जाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी वर्ष २०२५-२६ करीता वसतिगृहज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अवर सचिव आ. सु. जोगळेकर यांनी  दिली आहे.

 

बी.ए.,बी. कॉम.बी.एस.सी. अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए.एम.एस.सी. असे पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करावेत. १२ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. १८ ऑगस्ट २०२५ रोजी गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी अंतिम करून प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी १ सप्टेंबर २०२५ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २ सप्टेंबर २०२५ रोजी रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतीक्षा यादी मधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत वसतिगृह प्रवेशासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहेअसे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi