Friday, 22 August 2025

इज ऑफ डूईंग बिझनेस'साठी स्वतंत्र 'वॉर रूम'

 इज ऑफ डूईंग बिझनेस'साठी स्वतंत्र 'वॉर रूम'

या आपत्तीला संधी मानून राज्याच्या इज ऑफ डूईंग बिझनेसमध्ये जास्तीत जास्त बदल करण्यात यावेत. 'इज ऑफ डूइंग बिजनेसधोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वॉर रूमची निर्मिती करण्यात यावीअसे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 'इज ऑफ डूईंग बिझनेससाठी निर्माण करण्यात येणाऱ्या वॉर रूमचा दर महिन्याला आढावाही घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेराज्यामध्ये खासगी औद्योगिक पार्कसाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक वसाहतींच्या बाहेर असे औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी स्पष्ट धोरण आणावे. यामध्ये लघु आणि मध्यम उद्योगांचा प्राधान्याने अंतर्भाव असावा. त्यातून उद्योजकांना उद्योगासाठी लागणारे परवाने तातडीने मिळतीलअशी व्यवस्था असावी. यामुळे राज्यात निश्चितच उद्योगांच्या माध्यमातून समृद्धी येऊन रोजगार निर्मितीमध्ये वाढ होईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi