आत्मनिर्भर भारतासाठी आपल्यातील सत्व व बल देऊ
- डॉ. मोहन भागवत
आजच्या जागतिक परिभाषेत ग्लोबलची भावना व वसुधैव कुटुंबकम एकच आहे. वसुधैव कुटुंबकम याचा पाया समृद्ध आहे. संस्कृत भाषेने दिलेले हे ज्ञानाचे बळ जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर त्यातील भावही आपल्या लक्षात आले पाहिजे. त्यासाठी भाषा आवश्यक असते. अनेक ज्ञानाचे भांडार संस्कृत भाषेतील पाठ, स्त्रोत्र यांच्या माध्यमातून अनेक घरात पोहचले असले तरी संस्कृत भाषा आता राजाश्रित होण्यासह लोकाश्रितही झाली पाहिजे, असे डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हाच खरा महत्त्वाचा काळ आहे. यासाठी आपले सत्व मोलाचे आहे. स्वनिर्भरता ही या सत्वावर अवलंबून असते. बळही यासाठी आवश्यक असते. कोणत्याही बळाच्या पाठीमागे चित्त, मन व बुद्धी स्वाभिमानी असली की असे बळ अधिक विधायक ठरते, असे त्यांनी सांगितले.
सत्व आणि बळ जिथे असते तिथे ओज येते. ओजापाठोपाठ लक्ष्मीचाही तिथे वास निर्माण होतो या शब्दात त्यांनी समृद्ध भारताची भूमिका विषद केली. आजच्या भवतालाची ही गरज आहे. यासाठी प्रत्येकाने आपले बळ दिले पाहिजे. हे सत्व आपल्याला अधिक कळण्यासाठी संस्कृत भाषा हा मुख्य आधार आहे. संस्कृत भाषा व यातील ज्ञानाची शक्तीस्थळे आपण समजून घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कुलगुरु आचार्य हरेराम त्रिपाठी यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यापिठामार्फत राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. माजी कुलगुरु आचार्य उमा वैद्य, कुलसचिव देवानंद शुक्ल, अभिनव भारतीचे संचालक प्रो. कृष्णकुमार पाण्डेय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment