रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी क्रीडा मंत्र्यांकडून
जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा
“महाराष्ट्राची हिरकणी” म्हणून गौरव – क्रीडा सोयीसुविधांसाठी
थेट संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राची युवा रिदमिक जिमनॅस्ट संयुक्ता प्रसेन काळे हिची वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५, रिओ दि जानेरो (ब्राझील) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी संयुक्ताशी दूरध्वनीवरून संवाद साधत तिला शुभेच्छा दिल्या.
या संभाषणात मंत्री कोकाटे यांनी “महाराष्ट्राची हिरकणी” असा संयुक्ताचा गौरव करत तिच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीनेही तिला शुभेच्छा दिल्या. संयुक्ताच्या पालकांसह प्रशिक्षक मानसी गावंडे आणि पूजा सुर्वे यांचेही अभिनंदन करण्यात आले. खेळासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांसाठी थेट फोन करण्याचे आवाहनही मंत्री कोकाटे यांनी केले.
No comments:
Post a Comment